रुंगटा कन्या विद्यालयात रंगला गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:15+5:302021-03-01T04:17:15+5:30

नाशिक : पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. शालेय समितीचे अध्यक्ष विलास पुरकर हे या कार्यक्रमाच्या ...

Rangala Gunagaurav ceremony at Rungta Kanya Vidyalaya | रुंगटा कन्या विद्यालयात रंगला गुणगौरव सोहळा

रुंगटा कन्या विद्यालयात रंगला गुणगौरव सोहळा

Next

नाशिक : पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. शालेय समितीचे अध्यक्ष विलास पुरकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विनायक एडगावकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.

व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर, पर्यवेक्षिका स्मिता पाठक, जू.स.रुंगटा विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. वैशाली शिरसाठ यांनी ईशस्तवन सादर केले. यशश्री कसरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मनीषा हलकंदर यांनी मान्यवरांचा सत्कार व परिचय करून दिला. अरुण गायकवाड यांनी त्यांच्या मनोगतात बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे कौतुक केले. एडगावकर यांनी आपल्या भाषणात मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी कोठेही कमी पडत नाहीत, असे सांगितले. पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या तीन शिक्षकांनी राष्ट्रपती पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुरकर यांनी आपल्या भाषणात यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींनी मागील वर्षीच्या शंभर टक्क्यांची परंपरा कायम ठेवतानाच अधिक घवघवीत यश संपादन करावे, असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली भट व मालन कराळे यांनी केले. दीपाली खाडे यांनी आभार मानले.

Web Title: Rangala Gunagaurav ceremony at Rungta Kanya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.