कलात्मक लघुपटांनी रंगला महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:35 AM2021-01-11T00:35:51+5:302021-01-11T00:36:14+5:30

चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत  कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला. भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. या महोत्सवात राज्यभरातील एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते.

Rangala Mahotsav with artistic short films | कलात्मक लघुपटांनी रंगला महोत्सव

दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबातील वासंती फाळके, स्वाती फाळके-काळे, गिरिजा फाळके-मराठे यांचा सत्कार करताना भरत दैनी, सई पेंढारकर-सपकाळे, देवीदास जोशी, परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी.

Next
ठळक मुद्देऔचित्य : फाळके, पेंढारकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

नाशिक : चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत  कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला.
भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. या महोत्सवात राज्यभरातील एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके तसेच तिला संजीवनी प्रदान करणाऱ्या भालजी पेंढारकर या दोन्ही श्रेष्ठ चित्रपटतपस्वींचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न कलातीर्थच्या वतीने करण्यात आल्याचे जयदीप पवार यांनी सांगितले. महोत्सवाच्या आयोजनासाठी  कलातीर्थचे शौनक गायधनी, सुमंत वैद्य, जयदीप पवार, अभिषेक पिंगळे, महेश चौधरी, तेजस बिल्दीकर, तेजस देव, स्वरदा लगड कुलकर्णी, पुष्कर पाडेकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, अवंती रत्नपारखी, पराग लेले यांनी विशेष परिश्रम घेतले. 
n भालजी पेंढारकर यांचे नातू भरत दैनी आणि नात सई पेंढारकर-सपकाळे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके-काळे, वासंती फाळके, पणती गिरिजा फाळके- मराठे यांना सन्मानित करण्यात आले. फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने करण्यात आलेल्या या सत्कारास रसिक प्रेक्षकांनीदेखील भरभरून दाद दिली. फाळके यांच्या कर्मभूमीत त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा सन्मान झाल्याबद्दल  फाळके कुटुंबीयांनी समाधान  व्यक्त केले. 

Web Title: Rangala Mahotsav with artistic short films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.