चांदवड महाविद्यालयात रंगली काव्य मैफल
By admin | Published: August 14, 2014 10:27 PM2014-08-14T22:27:56+5:302014-08-15T00:35:28+5:30
चांदवड महाविद्यालयात रंगली काव्य मैफल
चांदवड : येथील श्रीमान पे. द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयात वाङ्मय मंडळ व पेटी वाचनालयाचे उद्घाटन मालेगाव येथील प्रसिद्ध कवी प्रा.आर.एन. शिरसाठ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डी.एन. शिंपी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील, पर्यवेक्षक प्रा. पी.व्ही. ठाकोर, वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. व्ही.डी. बागुल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कवी प्रा.रमेश शिरसाठ यांनी कवितेची निर्मिती कशी होते यावर मार्गदर्शन केले, तर प्रा. डी.एन. शिंपी, प्राचार्य डॉ.जी.एच. जैन यांची भाषणे झाली. यावेळी अनेक कवींनी कविता सादर करून काव्य मैफल रंगविली. सूत्रसंचालन प्रा.व्ही.डी. बागुल, प्रास्ताविक प्रा.पी.व्ही. ठाकोर यांनी केले. आभार प्रा. वाय.व्ही. देवरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.यू.के. जाधव, प्रा.एस.जी.रोकडे, वाय.एस. पाटील, पी.एम. जाधव, प्रा. चोरडिया, वेताळ, खैरे, जाधव, सलादे, श्रीमती आर.व्ही. परदेशी, श्रीमती जे.व्ही. वाघचौरे उपस्थित होते.(वार्ताहर)