वाचकांपर्यंत पोहचण्याची गरज रंगनाथ पठारे : पुस्तक पेठ दालनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:05 AM2017-11-13T01:05:23+5:302017-11-13T01:06:43+5:30

पुस्तकांवर प्रेम करणारे वाचक महाराष्टÑात मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्यापर्यंत प्रकाशक, विक्रेते यांनी पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे.

Ranganath Plateau: Need to reach readers | वाचकांपर्यंत पोहचण्याची गरज रंगनाथ पठारे : पुस्तक पेठ दालनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

वाचकांपर्यंत पोहचण्याची गरज रंगनाथ पठारे : पुस्तक पेठ दालनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

Next
ठळक मुद्देकुसुमाग्रज स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजनपुस्तकालय हे सांस्कृतिक केंद्र असले पाहिजेनव्या पिढीला वाचनसाक्षर करण्याचा कार्यक्रम

नाशिक : पुस्तकांवर प्रेम करणारे वाचक महाराष्टत मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्यापर्यंत प्रकाशक, विक्रेते यांनी पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे. पुस्तकांकडे माणूस येण्यापेक्षा माणसाकडे पुस्तके आली पाहिजेत, असे प्रतिपादन साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. ‘पुस्तक पेठ’च्या नाशिकमधील दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी (दि.१२) दुपारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, पुस्तकालय हे सांस्कृतिक केंद्र असले पाहिजे. तेथे वाचक आणि लेखक, प्रकाशक यांचा संवाद झाला पाहिजे. वाचकांच्या अपेक्षा समजल्या पाहिजे. या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे काम पुस्तक पेठेच्या पुणे शाखेत उत्कृष्टरीत्या केले जात असून, तीच प्रथा नाशिकमध्येही पहायला मिळणार आहे.
अभिरुचीचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या दालनाद्वारे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम यांनी पाश्चात्त्यांच्या धर्तीवर हवा तितका वेळ शांत बसून पुस्तक वाचण्यास जागा, कॉफीसह इतर पेय देत पुस्तक दुकानाद्वारे होणारे आदरातिथ्य, त्यामुळे पुस्तक घ्यायचे नाही हे ठरवून आलेली व्यक्ती सहज करून जात असलेली पुस्तकांची खरेदी पाहता आपल्याकडेही अशी पुस्तकांची दुकाने शहराशहरात व्हायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. माधव वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले. संजय जोशी यांनी प्रास्ताविक केले. निखिल दाते यांनी आभार मानले. याप्रसंगी साहित्यिक, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साक्षरता अभियान हा कार्यक्रम जसा राबविला गेला तसाच आता नव्या पिढीला वाचनसाक्षर करण्याचा कार्यक्रम राबविला गेला पाहिजे अन् ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ गायक पंडित विष्णू दिगंबर हे कुणाच्याही निमंत्रणाशिवाय भारतभर फिरून लोकांना गाणं ऐकवायचे. ते म्हणत, कानसेन तयार केल्याशिवाय गायनसेन कसे तयार होतील. त्याचप्रमाणे चांगली पुस्तके वाचण्यासाठी वाचक तयार केले पाहिजे. त्यांनी वाचनासाठी प्रेरित व्हावे, असे अनुकूल वातावरण त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे, असा आग्रही त्यांनी धरला.

Web Title: Ranganath Plateau: Need to reach readers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.