बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

By admin | Published: November 11, 2016 10:40 PM2016-11-11T22:40:52+5:302016-11-11T22:49:48+5:30

बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

Range in banks next day | बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

बॅँकांमध्ये दुसऱ्या दिवशीही रांगा

Next

नाशिक : जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी नागरिकांना बॅँकेतून नोटा बदलून न मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या प्रकाराने नागरिकांची आर्थिक कोंडी होताना दिसत होती, तर सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.चांदवड : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा केंद्र शासनाने चलनातून बंद केल्याने गुरुवारी व शुक्रवारी चांदवड शहरातील सर्वच बॅँकांसमोर महिला -पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. काही बॅँकेमध्ये पोलीस यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवण्यात आले तर ग्राहक व बॅँक कर्मचारी यांच्यात ताणतणावामुळे खटके उडण्याचे प्रकार घडताना दिसत होते. त्यातच कालपर्यंत सहकारी पतसंस्थांमध्ये कर्ज स्वरूपात व चालू खात्यावर पाचशे व हजार रुपयांच्या नोट्या घेतल्या जात होत्या; मात्र सहकार खात्याचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी फतवा काढल्याने या पतसंस्थांनीही आज दिवसभरात एक रुपयाही स्वीकारला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अजून अडचण निर्माण झाली. चांदवड शहरातील स्टेट बॅँक आॅफ इंडिया, बॅँक आॅफ महाराष्ट्र, चांदवड मर्चण्ट बॅँक, जिल्हा मध्यवर्ती बॅँक या शाखा उघडण्याआधीच ग्राहक व महिला सकाळी ९ ते १० वाजेपासून पायरीवर येऊन बसतात, असा अनुभव दोन दिवसांपासून येत आहे. प्रत्येकाने आपल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बॅँकेतील खात्यावर जमा करून केवायसी म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड द्यावयाचे आहे. त्यामुळे ग्राहक सैरावैरा पळताना दिसत होते.
(लोकमत ब्यूरो)

Web Title: Range in banks next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.