रणरणत्या उन्हात टँकरपुढे रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:27 AM2018-04-05T00:27:30+5:302018-04-05T00:27:30+5:30
गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला मागील काही दिवसांपासून गळती लागली असेल मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या सदर बाब उशिरा लक्षात आली असावी, असे संतप्त महिलांनी सांगितले. जलवाहिनी दुरुस्ती मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे बुधवार ‘कोरडा दिवस’ ठरला. गुरुवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे. भर उन्हाळ्यात वडाळागाव परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सकाळी वडाळागावातील दैनंदिन पाणीपुरवठा संपूर्णपणे खंडित झाल्याने नळ कोरडेठाक पडले होते. सकाळी सात ते अकरा वाजेच्या वेळेत वडाळागावसारख्या गावठाण व दाट लोकवस्तीच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर पुरविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून परिसरनिहाय होणे अपेक्षित होते; मात्र दुपारी नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर
टॅँकर गावात सुरू झाले. परिणामी कमाल तपमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहचलेला असताना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ‘चटके’ सहन करण्याची वेळ महिलांवर ओढवली. त्यामुळे वडाळागाव परिसरातील महिलांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी बारा वाजेनंतर वडाळागावात दोन टॅँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली होती.
या भागांना फटका
प्रभाग १६ मधील उपनगर (शांतीपार्क) ते रामदास स्वामीनगरचा परिसर, प्रभाग १८ मधील नारायणबापूनगर ते दसक गाव, प्रभाग १८ मधील शिवाजीनगर ते शिवशक्तीनगर परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी ते सामनगाव, प्रभाग २० मधील जयभवानीरोड ते बिटको कॉलेज परिसर व आर्टिलरी सेंटर रोड, प्रभाग २२ मधील विहितगाव ते वडनेररोड व प्रभाग २३ मधील दीपालीनगर ते साईनाथनगर, वडाळारोड परिसरासह गावठाण भागात पाणी पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
पाण्याचे दुर्भिक्ष; उन्हाच्या झळा अन् महिलांची वणवण
वडाळागावात दाट लोकवस्ती असून, लहान घरे असल्यामुळे रहिवाशांना पाणीसाठा करणे जिकिरीचे होते. जलवाहिनी दुरुस्तीचे अचानकपणे काम वाढल्याने बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विभागाने सकाळच्या सुमारास टॅँकर वडाळागावात पाठविणे गरजेचे होते; मात्र दुपारी संबंधित लोकप्रतिनिधींकडे नागरिकांनी ओरड केल्यानंतर टॅँकर गावात पोहचले. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला.