चिंचलेखैरे येथे रंगला रानभाजी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:30 PM2019-09-26T22:30:00+5:302019-09-26T22:32:25+5:30

इगतपुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे येथे पोषण आहार मास निमित्त विविध उपक्र म राबविण्यात आले. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, ग्रामस्वच्छता, प्रभात फेरी तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या पद्धती यासह विविध उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात आले.

Rangla Ranbhaji Festival at Chinchlekhair | चिंचलेखैरे येथे रंगला रानभाजी महोत्सव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे येथे पोषण आहार माहे निमित्त रानभाजी महोत्सवाची पहाणी करतांना ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी.

Next
ठळक मुद्दे७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

इगतपुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे येथे पोषण आहार मास निमित्त विविध उपक्र म राबविण्यात आले. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, ग्रामस्वच्छता, प्रभात फेरी तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या पद्धती यासह विविध उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात आले.
आरोग्याचे पोषण याचाच एक भाग म्हणून आदिवासी दुर्गम भागातील रानभाज्या व सेंद्रिय पद्धतीने आहाराचे मानवी शरीरासाठी होणारे फायदे जाणून घेणे व त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेणे यासाठी चिंचलेखैरे येथे शाळेमध्ये रानभाजी महोत्सव विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला. यामध्ये पाच विद्यार्थ्यांचे स्टॉल करून मांडणी केली. यात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी इगतपुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून खास करून या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांनी भेट दिली आणि प्रत्यक्ष रान भाज्यांचा आस्वाद घेतला आगळावेगळा अनुभव व निसर्गाच्या सहवासात जाऊन लहान मुलांमधील लहान होण्याचा आनंद या विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.

प्रतिक्रि या---
भाजीपाल्यातील रासायनिक पदार्थांच्या सेवनामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे.
वाढत्या आजारांमुळे सेंद्रिय आहार काळाची गरज बनली आहे.शाळेने राबविलेला उपक्र म कौतुकास पात्र आहे.
- रमेशसिंह परदेशी,
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ.
शाळेत बालवयापासुन रानभाज्या व सेंद्रिय भाजीपालाचे महत्व समजाऊन दिल्यास आरोग्यास उपयोग होईल हे धोरण ठेवून शाळेत हा उपक्र म राबविला जात आहे याला पालक विद्यार्थी व समाज चांगला प्रतिसाद देत आहेत
- निवृत्ती तळपाडे, मुख्याध्यापक.
(फोटो २६ रानभाजी, २६ रानभाजी १)

Web Title: Rangla Ranbhaji Festival at Chinchlekhair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.