राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:06+5:302021-06-19T04:11:06+5:30
कमी दाबाने पाणीपुरवठा नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कमी ...
कमी दाबाने पाणीपुरवठा
नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने अनेकांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने अपघात
नाशिक : शहरातील काही रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर ते पुन्हा बुजविताना व्यवस्थित बुजविले गेले नसल्याने जागा खाली-वर होऊन तेथे खटकी तयार झाली आहे. या ठिकाणी दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे व्यवस्थित बुजविण्याच्या संबंधितांना सूचना देण्याची मागणी होत आहे.
पाऊस लांबल्याने चिंता
नाशिक : पाऊस लांबल्याने ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना आता पिके जगविण्याची कसरत करावी लागत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पिकांना पाणी दिले आहे. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
लसींच्या तुटवड्यामुळे नाराजी
नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात; मात्र लस उपलब्ध होत नसल्याने त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
सायकल ट्रॅकवर चारचाकी
नाशिक : शहरात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहने उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सायकलप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्रॅकवर वाहने उभी केल्याने सायकलचालकांनी जायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ड्रेनेजचे ढापे आले वरती
नाशिक : शहरातील जीपीओ रोडवर काही ठिकाणी ड्रेनेजचे ढापे अधिकच वर आल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: दुचाकीस्वारांना याचा अधिक धाेका असल्याने महापालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करून ढापे पूर्ववत करावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
चार वाजता दुकानदारांची धावपळ
नाशिक : शहरातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या दुकानांमध्ये या काळात गर्दी असते त्या दुकानदारांना गर्दी आवरताना मोठी कसरत करावी लागते. चार वाजताच पोलीस गाडी फिरू लागते, यामुळे दुकानदारांची धावपळ होते.
द्वारका चौकात वाहतुकीचा फज्जा
नाशिक : द्वारका चौकात वाहतुकीचा पूर्ण फज्जा उडाला असून, या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उड्डाण पुलावरून होणारी वाहतूक खालून वळविल्यामुळे य ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी हाेत असते.