बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना न्याय रंजना भानसी : सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:14 AM2018-04-09T01:14:27+5:302018-04-09T01:14:27+5:30

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा कायद्यामुळे आजमितीला देशात महिला वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाल्या.

Ranjana Bhansi: Inauguration of Social Equity Week for Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना न्याय रंजना भानसी : सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना न्याय रंजना भानसी : सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देसप्ताहाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा कायद्यामुळे आजमितीला देशात महिला वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाल्या असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिलांना न्याय मिळत असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त रविवार (दि.८) पासून सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात झाली असून, शनिवार (दि.१४) पर्यंत या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, सहायक आयुक्त प्राची वाजे आदी उपस्थित होते. भानसी म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे महिलांना विविध क्षेत्रात विकासाची संधी प्राप्त झाल्याचे भानसी यांनी सांगितले. तर सामाजिक समता सप्ताहच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे मत आमदार बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र कलाल यांनी केले. यावेळी देवीदास नांदगावकर, अजय गांगुर्डे, एस. बी. त्रिभुवन, सुभाष फड, अनिल तिडमे, शंतनू सावकार, व्ही. जी. भावसार, श्रीमती नीता नागरे, संदीप वळवी तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ranjana Bhansi: Inauguration of Social Equity Week for Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.