२०० तास चालून २०१७चे स्वागत करत तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रंजय त्रिवेदी यांचे नाशकात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:48 PM2017-12-09T21:48:10+5:302017-12-09T22:12:21+5:30

‘वर्षाची अखेर जीवनाची अखेर ठरणार नाही, यासाठी व्यसनाधिनतेपासून स्वत:सह आपल्या मित्रांना सुरक्षित ठेवा, मद्याच्या आहारी जाऊ नका’ असा संदेश ते तरुणाईला देण्यासाठी २०१३ सालापासून त्रिवेदी यांनी थर्टी फर्स्टच्या पुर्वसंध्येला जॉगिंग ट्रॅकवर पाऊले टाकण्यास सुरूवात केली होती.

Ranjeet Trivedi dies in Nashik, who gives message of addiction to youth for 201 hours | २०० तास चालून २०१७चे स्वागत करत तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रंजय त्रिवेदी यांचे नाशकात निधन

२०० तास चालून २०१७चे स्वागत करत तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रंजय त्रिवेदी यांचे नाशकात निधन

googlenewsNext
ठळक मुद्देवांद्रे ते गेटवे आॅफ इंडियापर्यंत ४८ तास पायी चालण्याचा संकल्प सोडला होता२०१७च्या स्वागतासाठी त्यांनी दोनशे तास चालण्याचा संकल्प नऊ जानेवारी सकाळी साडेनऊ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण केला

नाशिक : व्यसनाधिनता सोडून सुदृढ आरोग्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असा संदेश देत रंजय त्रिवेदी यांनी २०१३ सालापासून सलग तासन्तास नाशिकच्या जॉगिंक ट्रॅकवर चालण्याचा संकल्प सोडला होता. त्यांनी २०१७ या नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फस्टच्या सुर्यास्तापासून त्रिवेदी यांनी पायी फेºया मारण्यास सुरूवात केली. सलग नऊ जानेवारी २०१७पर्यंत त्यांनी २०० तास चालण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदविलाा होता. त्रिवेदी यांना शनिवारी ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
‘वर्षाची अखेर जीवनाची अखेर ठरणार नाही, यासाठी व्यसनाधिनतेपासून स्वत:सह आपल्या मित्रांना सुरक्षित ठेवा, मद्याच्या आहारी जाऊ नका’ असा संदेश ते तरुणाईला देण्यासाठी २०१३ सालापासून त्रिवेदी यांनी थर्टी फर्स्टच्या पुर्वसंध्येला जॉगिंग ट्रॅकवर पाऊले टाकण्यास सुरूवात केली होती. २०१३ला त्यांनी २४ तास चालून २०१४चे स्वागत केले होते तर २०१५चे स्वागत १४४ तास चालून केले होते. २०१७च्या स्वागतासाठी त्यांनी दोनशे तास चालण्याचा संकल्प नऊ जानेवारी सकाळी साडेनऊ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.
सकाळी किंवा संध्याकाळी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे चालण्याची सवय लावून घेत निरामय आरोग्य जगावे, असे आवाहन त्रिवेदी यांनी या उपक्रमांच्या माध्यमातून नाशिककरांना सातत्याने केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या थर्टी फर्स्टरोजी त्रिवेदी यांची नाशिककरांना प्रकर्षाने आठवण होईल.


त्रिवेदी यांना दररोज सकाळी गोल्फ क्लब ट्रॅकवर दहा ते बारा फे-या मारण्याची सवय होती. निरामय आरोग्यासाठी चालण्याशिवाय दुसरा उत्तम व्यायाम नाही, असे त्यांचे मत होते. जगात अद्याप कोणाच्याही नावावर दोनशे तास सलग चालण्याचा विक्रम नसल्याचा दावा त्रिवेदी जानेवारीमध्या माध्यमांशी बोलताना केला होता. हा संकल्प पूर्ण करताना सूर्य मध्यावर आल्यानंतर त्रिवेदी यांना त्रास होत होता. दर तासाला दहा ते पंधरा मिनिटे विश्रांती घेत त्यांनी संकल्प पूर्ण केला होता. नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्रिवेदी यांनी चालणे थांबविले. यावेळी तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांचे ट्रॅकवर जाऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या होत्या.

या ‘थर्टी फर्स्ट’ला मुंबईकरांना देणार होते व्यसनमुक्तीचा संदेश
२०१८च्या स्वागतासाठी रंजय त्रिवेदी यांचा सराव सुरू झाला होता. त्यांनी वांद्रे ते गेटवे आॅफ इंडियापर्यंत ४८ तास पायी चालण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी ते गुरूवारी मुंबईला जाऊन मार्गाची पाहणीही करुन आले होते. ‘थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यप्राशन करुन नववर्षाचे स्वागत करु नका, निरोगी आयुष्य जगा’ असा संदेश ते यंदा मुंबईकरांना देणार होते

Read in English

Web Title: Ranjeet Trivedi dies in Nashik, who gives message of addiction to youth for 201 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.