रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:52 PM2020-09-02T16:52:41+5:302020-09-02T16:54:14+5:30

घोटी : महाराष्ट्र रणजी क्रि केट संघाचे प्रशिक्षक रणजीपटू शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून दरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. यादरम्यान सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते सुमारे ३०० फुट खोल दरीत ते पडल्याचे प्रशासनाने सांगितले.

Ranji cricket coach Shekhar Gawli dies after falling in valley | रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु

रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु

Next
ठळक मुद्देघोटी : शोध मोहीमेनंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला ; क्र ीडा क्षेत्रात हळहळ

घोटी : महाराष्ट्र रणजी क्रि केट संघाचे प्रशिक्षक रणजीपटू शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून दरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला.
मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. यादरम्यान सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते सुमारे ३०० फुट खोल दरीत ते पडल्याचे प्रशासनाने सांगितले.
गवळी हे खोल दरीत पडल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टिमला पाचारण करण्यात आले होते. मात्र अंधार पडल्याने व पावसाची संततधार सुरू असल्याने रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्र ीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी (दि.२) पहाटे ५ वाजेपासून तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर, कसारा व नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे,अक्षय राठोड, विनोद आयरे, मयुर गुप्ता, लक्ष्मण वाघ, दत्ता बाताडे, मानस लोहकरे, दयानंद कोळी, विकास लाटे, मिलिंद लोहकरे, किरण धाईजे यांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले.
बुधवारी (दि.२) सकाळी दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पुलाखालील एका पाण्याच्या डोहाच्या कडेला अडकलेल्या स्थितीत श्ेखर गवळी यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आला.
महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रि केट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. शेखर गवळी हे १९९ते २००४ पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रि केट खेळलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीनियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असत. या दुखद घटनेमुळे क्र ीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(फोटो ०२ शेखर गवळी,१)
इगतपुरी : हॉटेल गणाकाच्या मागील बाजुस असलेल्या डोहातुन शेखर गवळी यांचा मृतदेह काढतांना आपत्ती व्यवस्थापन टीम.

Web Title: Ranji cricket coach Shekhar Gawli dies after falling in valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.