नाशिकच्या मैदानावरील ‘रणजी क्रिकेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:49 AM2018-12-13T00:49:26+5:302018-12-13T00:50:16+5:30

रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

 'Ranji Cricket' at Nashik Stadium | नाशिकच्या मैदानावरील ‘रणजी क्रिकेट’

नाशिकच्या मैदानावरील ‘रणजी क्रिकेट’

googlenewsNext

रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. दि. १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट विरुद्ध सौराष्ट हा रणजी क्रिकेट सामना होणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये नऊ रणजी सामने झाले आहेत. या मैदानावर अनेक विक्रमांचा पाऊस पडला असल्याने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाशिकचे मैदान अनेक खेळाडूंना लाभदायक ठरले आहे. नाशिकच्या मैदानावर खेळणाऱ्यांना मोठी संधी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या मैदानावर आजवर अनेक विक्रम झाले आहेत. नाशिकचे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या विक्रमांचा साक्षीदार आहे.
सन २००५ पासून होणाºया रणजी सामन्यामुळे नाशिकचे नाव रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून घेतले जाते. नाशिकच्या आल्हाददायक वातावरणात आजवर झालेल्या रणजी सामन्यात खेळाडूंनीदेखील नाशिकच्या वातावरणात खेळण्याचा आनंद काही वेगळाच असल्याचे सांगितले आहे. राज्यात अनेक ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळणारे अनेक खेळाडू हे नाशिकमध्ये प्रथमच खेळत असल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये खेळण्याची उत्सुकता असतेच. अशीच उत्सुकता महाराष्टÑ आणि सौराष्टÑातील अनेक खेळाडूंच्या बाबतीत आहे.
सन २००५ पासून नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर एकूण नऊ रणजी क्रिकेट सामने झाले आहेत. त्यामध्ये १९ शतकांची नोंद झाली आहे. यामध्ये अभिनव मुकुंद आणि आकाश चोप्रा यांच्या त्रिशतकाचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुरली विजय याच्या द्विशतकानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. नाशिकच्या मैदानावर झालेल्या नऊ रणजी सामन्यांपैकी चार सामन्यांचा निकाल लागला आहे तर पाच सामने अनिर्णित राहिले. तीन सामन्यांमध्ये महाराष्टÑाला विजय मिळाला आहे तर एक सामना मुंबईने जिंकला आहे. आता या सामन्यात महाराष्ट्रासह सौराष्टÑची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल असे मत खेळाडूंनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या मैदानावर निर्णायक सामना होण्याची शक्यता असल्याने दोन्ही संघांना गुणांची वाढ करण्याची संधी आहे. सकाळच्या सत्रात पडणाºया दवबिंदूंमुळे मात्र खेळपट्टी गोलंदाजांना साथ देऊ शकते, त्यामुळे गोलंदाजांची कामगिरीदेखील महत्त्वाची ठरणार आहे. या मैदानावर फलंदाजांचे विक्रम असल्यामुळे केदार जाधवच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नाशिकमधूनच  उघडले भारतीय क्रिकेट संघाचे द्वार
नाशिकमध्ये रणजी सामने खेळत असतानाच या मैदानावरील कामगिरीच्या आधारे अनेकांना भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले. काहींची नावे तर भारतीय संघात याच मैदानावरून घोषित झाली आहेत. त्यामुळे नाशिकचे मैदान अनेकांना ‘लकी’ ठरले आहे. त्यामध्ये भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा, ुंमुनाफ पटेल, उमेश यादव, कुलदीप यादव आणि मुरली विजय यांचा समावेश आहे. २००८ मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळताना तामिळनाडूचा मुरली विजय याने २४३ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या आधारावर त्याची भारतीय संघात नागपूर येथील कसोटीसाठी निवड झाली आणि त्याला दुसºयाच दिवशी नाशिकहून नागपूर गाठावे लागले होते.
रोहित शर्माच्या बाबतीतही अशीच घटना आहे. आपल्या सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते अशी परिस्थिती असताना सातत्याने त्याची संधी हुकली जात होती. २०१० मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळत असतानाच त्याची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड झाली. नीलेश कुलकर्णीसाठीही नाशिकमधूनच राष्टÑीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले होते. कुलदीप यादवने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चुणूक दाखविली होती. मुनाफही नाशिकमध्येच प्रकाशझोतात आला.

Web Title:  'Ranji Cricket' at Nashik Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.