रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:57 PM2020-04-11T20:57:18+5:302020-04-12T00:29:07+5:30

त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.

 Ranmava says, I want a chance! | रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

googlenewsNext

वसंत तिवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसºया सप्ताहात त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत जंगलातील कैºया, करवंदे, मोहाची फुले, तोरणे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण-पश्चिमेस तसेच उत्तर बाजूला घनदाट जंगल असून, मुबलक प्रमाणात निसर्गाच्या कृपादृष्टीने रानमेव्याने लगडलेली दाट झाडी आहेत. त्यात करवंदच्या काटेरी जाळ्या, मोहाचे अवाढव्य असलेले झाड, त्या झाडाखाली मोहाच्या पडलेल्या पांढºया पण गुंगी येईल अशा फुलांचा सडा, तर काही रायवळ समजली जाणारी कैऱ्यांचे घड असलेली आंब्याची झाडे, महिना दीड महिन्यात येणारी जांभळे व चिंचाचा बहर तर जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आला आहे. गावठी चॉकलेट रंगाचे आवळे रस्त्यावर वाटे घालून बसलेल्या रानमेव्याच्या विक्रेत्यांभोवती कडे करून वाटसरू खरेदी करताना दिसतात. विशेषत: उन्हाळ्यात सर्वांनाच आंबट खाण्याचा मोह होतो. कैºयांचा लसणी मिरची व मीठ टाकून केलेला ठेचा जेवणाची निश्चितच गोडी वाढवतो.
कच्च्या करवंदाचे लोणचे, भाजी, आवळ्याचे अनेक पाचक गुण असलेला मोरावळा, मुरांबा, आवळा कँडी यांनी अधिक पसंती असते. मोठ्या हॉटेल्समध्ये करवंदाच्या लोणच्याला चांगली मागणी असते. मोहाच्या फुलालाही मागणी असते.
-----------
लॉकडाउनमुळे वाढल्या चिंता
दिवाळी संपल्यानंतर त्र्यंबकेश्वरला स्थलांतर होत असते. वैशाख ज्येष्ठात खरीप हंगाम सुरू होतो. रोप तयार करण्यासाठी जमीन भाजणी सुरू होते; पण तोपर्यंत दोन पैसे गाठीला असावेत म्हणून अनेक कुटुंबे शहरात स्थलांतर करून दोन पैसे कमावतात; पण यावर्षी लोकांचे गणित चुकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे कामच बंद पडले. हाती पैसे नसल्याने लागवडीची चिंता. दररोजच्या पोटापाण्यासाठी रानमेवा विकून जेवणाची भूक भागविली जाते. आता लॉकडाउनमुळे तेही शक्य नसल्याने या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

Web Title:  Ranmava says, I want a chance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक