‘ते’ संबंध जाहीर न करण्यासाठी खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:44 AM2017-08-13T00:44:38+5:302017-08-13T00:45:06+5:30

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाºया महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 The 'ransom' to not declare the relationship | ‘ते’ संबंध जाहीर न करण्यासाठी खंडणी

‘ते’ संबंध जाहीर न करण्यासाठी खंडणी

Next

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाºया महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरात एकाच समाजातील पाच मित्रांची अनेक वर्षांपासून मैत्री असून त्यांचे सहपरिवार एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे़ या पाच मित्रांपैकी संजय व सुशीलची पत्नी मीना यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयची पत्नी शालू (नावे बदलली आहेत़) हीस होता़ त्यामुळे शालूने या अनैतिक संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ शालूने जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत संजय व मीना यांचे मोबाइलवरील अनैतिक संबंधांचे पुरावे असलेले संभाषण रेकॉर्ड करून त्याच्या सीडी तयार केल्या़ या सीडीसाठी शालूला दोन लाख तीस हजार रुपये खर्च आला व तिने या खर्चाची मागणी सुशीलकडे केली़ मात्र हे पैसे देण्यास सुशीलने नकार दिल्याने संजय व मीना यांच्या अनैतिक संबंधांच्या संभाषणाच्या सीडी समाजातील जात पंचायत तसेच सुशीलच्या मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी शालूने दिली़ या प्रकारामुळे सुशील याने मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून शालूच्या विरोधात खंडणी तसेच बदनामीची फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच़ एच़ शेजवळ करीत आहेत़

Web Title:  The 'ransom' to not declare the relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.