विलास शिंदे यांना रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:17 PM2021-02-02T17:17:47+5:302021-02-02T17:20:14+5:30
दिंडोरी : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कवयित्री अनुराधा पाटील यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार, कृषी व मराठी भाषामंत्री डॉ. विश्वजीत कदम, पिंपरी-पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी या पुरस्कारांमागची भूमिका व्यक्त केली. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, ना. धों. महानोर, श्रीनिवास पाटील, स्व. पतंगराव कदम, विनायकदादा पाटील यांना देण्यात आला आहे.
विलास शिंदे यांना पुरस्कार प्रदान करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. शेजारी अरुण गुजराथी, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, डॉ. पी.डी. पाटील, सचिन ईटकर आदी. (०२ दिंडोरी १)