बलात्काराचा प्रयत्न पाच वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:06 AM2019-09-27T01:06:37+5:302019-09-27T01:07:03+5:30
लासलगाव : मूकबधिर महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुकदेव भाऊराव गोधडे (७२, रा. डोंगरगाव, ता. येवला) यास निफाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. पी. डी. दिग्रसकर यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पीडित महिलेच्या आईने याबाबत येवला तालुका पोलिसांत ३१ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, मूकबधिर मुलगी घरी एकटी असताना बळजबरीने सुकदेव गोधडे याने तिला त्याच्या घरात नेऊन बलात्काराचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार सुकदेव गोधडे याच्याविरु द्ध येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी निफाडच्या अति. जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक डी.ए. पाटील यांच्यासह एकूण सात साक्षीदारांनी साक्ष नोंदविली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. रामनाथ शिंदे यांनी युक्तिवाद केला.