निफाडला वेडसर वृद्ध महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:08 PM2018-09-07T23:08:47+5:302018-09-08T00:59:50+5:30
निफाड : येथे उगाव रोडवर साठवर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी जलदगतीने तपास करून एका संशयितास अटक केली आहे.
निफाड : येथे उगाव रोडवर साठवर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी जलदगतीने तपास करून एका संशयितास अटक केली आहे.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड येथील उगाव रोडवर रस्त्याच्या कडेला दररोज एक वेडसर वृद्ध महिला बसत असते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उगाव रोडवरील पद्मावती कलेक्शन या दुकानाच्या बाहेर अज्ञात इसमाने या महिलेच्या डोक्यावर, हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून तिचा बलात्कार केल्याची घटना घडली . ही घटना रात्रीच निफाड पोलिसांना कळाल्यानंतर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पिडले , पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक जयवंत सातव , सहायक पोलिस निरीक्षक आडसुळ , पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले . घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या वृद्ध महीलेला उपचारासाठी निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल. त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे ,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , पोलीस उपअधीक्षक माधव पिडले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करपे , पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड , पोलिस उप निरीक्षक अमोल पवार स्थानिक गुन्हे शाखेचे स पो नि शिलावट या पथकाने सी सी टीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा जलदगतीने तपास सुरू केला व चोवीस तासांच्या आत याप्रकरणातील संशयित राजेशराय दिनालाल यादव (२५ ) हल्ली राहणार राजीव गांधी नगर , निफाड ( मुळगाव- बेगूसराय, बिहार ) याला अटक करण्यात आली . याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिलांचे निवेदन
निफाड शहरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निफाड तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. सदर घटनेतील संशयित आरोपीस कडक शासन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन निफाडचे प्रांत महेश पाटील ,तहसीलदार दीपक पाटील , निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना देण्यात आले. यावेळी निफाड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी मोगल ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, सुभाष कराड,दिलीप कापसे, शिरीन मणियार,आरिफ मणियार, सुरेखा नागरे, सुरेखा कुशारे, निफाड शहर अध्यक्षा पद्मा खडताळे, परवीन शेख, शबाना मणियार आदींसह महिला उपस्थित होत्या.