अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:13 AM2020-05-30T00:13:06+5:302020-05-30T00:14:10+5:30
जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅनलरोड इंदिरानगर झोपडपट्टीतील पंधरा वर्षांच्या मुलीसोबत गेल्या दोन महिन्यांपासून संशयित अनिल राजेंद्र शर्मा (२१, रा. बालाजी स्विट््स, जेलरोड, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) हा मैत्री करण्याचा प्रयत्न करीत होता, तर मंगळवारी मध्यरात्रीपासून संशयित अनिल त्या अल्पवयीन मुलीला बुधवारी दुपारपर्यंत सतत फोन करत होता. मुलीने बुधवारी चारच्या सुमारास फोन उचलून बाथरुमला जाते असे सांगून फोन बंद केला. ही मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता अनिल शर्मा बळजबरीने शौचालयात घुसला. तिच्याशी अतिप्रसंग केला.