नराधम अद्याप फरार : 'त्या' मुलीला देहविक्रयच्या दरीत लोटणाऱ्या चौघी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:45 PM2020-07-09T18:45:18+5:302020-07-09T18:48:39+5:30

नराधमांनी आलिशाला वेळोवेळी पैसे देवून त्या निराश्रीत अल्पवयीन मुलीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीराची भूक भागविली. या तीघांचा पोलीस शोध घेत आहे.

Rapeist still absconding: Four women who fell into the trap of prostitution | नराधम अद्याप फरार : 'त्या' मुलीला देहविक्रयच्या दरीत लोटणाऱ्या चौघी गजाआड

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देसौदा होणार म्हणून तिने स्वत:ची केली सुटका

नाशिक : निराश्रीत अल्पवयीन मुलीला 'आधार' देण्याचे आमीष दाखवून तिचा विश्वास जिंकून घेत फूस लावत गंजमाळ भागातील चौघींनी त्या गरजू मुलीच्या मजबुरीचा गैरफायदा घेत देहविक्रय व्यवसायाच्या दरीत लोटले. या चौघा महिलांना अखेर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरूवारी (दि.९) बेड्या ठोकल्या. पिडितेवर शारिरिक अत्याचार करणाऱ्या नराधम अद्याप फरार आहेत.
पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याचे आश्वासन पिडितेला देणा-या आलीशा ऊर्फ सुलताना शब्बीर शेख (रा.पंचशीलनगर, गंजमाळ) या महिलेने बळजबरीने जयेश जाधव, आकडेवाला व गणेश नामक तीघा नराधमांद्वारे तिच्यावर बलात्कार घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या नराधमांनी आलिशाला वेळोवेळी पैसे देवून त्या निराश्रीत अल्पवयीन मुलीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीराची भूक भागविली. या तीघांचा पोलीस शोध घेत आहे. आलिशाने या मुलीला नंतर सज्जो सलीम शेख, हाजरा अल्ताफ शेख, शब्बो उर्फ सोनाली शशिकांत देशमुख यांच्याकडे देहविक्रयसाठी पाठविले. या महिलांनी वर्षभर या १५ वर्षीय पिडितेकडून देहविक्रय करून घेत अनैतिक व्यापार करून पैसे कमविले.
वर्षभर अन्याय-अत्याचार सहन करत आपला थेट सौदाच केला जाणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने जीवावर उदार होत आपली सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठत तीने आपबितीने कथन केली.  गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ तपासाला गती दिली.

Web Title: Rapeist still absconding: Four women who fell into the trap of prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.