अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांच्या दिंडोरी नगरपंचायततर्फे रॅपिड अँटिजेंन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 06:55 PM2021-04-06T18:55:25+5:302021-04-06T18:55:43+5:30

दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले असून शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सदरच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

Rapid Antigen Test by Dindori Nagar Panchayat for all professionals in essential services | अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांच्या दिंडोरी नगरपंचायततर्फे रॅपिड अँटिजेंन टेस्ट

अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांच्या दिंडोरी नगरपंचायततर्फे रॅपिड अँटिजेंन टेस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपंचायतीच्या आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हा कॅम्प

दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले असून शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सदरच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरपंचायतीच्या आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हा कॅम्प सुरू करण्यात आलेला असून मंगळवारी एकूण ५४ टेस्ट करण्यात आल्या त्यात चार जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले ह्या कॅम्प मुळे रुग्णांची ओळख लवकर होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करण्यात मदत होणार आहे.
दिंडोरी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी नागेश येवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी सदरच्या टेस्ट शिबिराचे आयोजन केले. अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांनी सदर टेस्ट अनिवार्य असून सर्वांनी सदर शिबिराचा लाभ घेत टेस्ट करून घेण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. (०६ कोरोना २)

Web Title: Rapid Antigen Test by Dindori Nagar Panchayat for all professionals in essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.