विनाकारण फिरणाऱ्यांची होतेय रॅपीड ॲटीजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:46 PM2021-04-19T19:46:06+5:302021-04-19T19:46:49+5:30
पिंपळगाव वाखारी : येथे असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर तालुका आरोग्य पथक व पोलिसांकडून कारवाई करून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे.
पिंपळगाव वाखारी : येथे असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर तालुका आरोग्य पथक व पोलिसांकडून कारवाई करून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे.
पिंपळगाव वाखारी येथे दररोज रुग्णसंख्या वाढत असून, जनता कर्फ्यू असूनही काही लोक पॉझिटिव्ह असतानाही नियम पाळत नसल्याने, ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभागाने सोमवारी (दि.१९) तालुका आरोग्य पथक व पोलिसांच्या मदतीने विनाकारण फिरताना आढळलेल्या पंधरा-वीस जणांवर कारवाई केली. यावेळी त्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली.
रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरण कक्षात भरती करून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. रोज नवीन रुग्ण आढळून येत असल्याने जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला. यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर काही प्रमाणात जाणवत आहे.
(१९ पिंपळगाव वाखारी)