मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:08 AM2022-01-11T00:08:39+5:302022-01-11T00:08:47+5:30

मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे.

Rapid increase in the number of coronavirites in Malegaon | मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Next
ठळक मुद्देतालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६८ झाली

मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे.

ग्रामीण भागात असलेल्या १७ बाधितांसह शहर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. कालपर्यंत शहरातील बाधित रुग्णसंख्या केवळ २७ आणि तालुक्यातील बाधितांची संख्या १२ इतकी होती. शहरात शासनाच्या जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. प्रशासनाने शहरात नियमांची कठोरपणे अंमल बजावणी करावी, मोकाट फिरणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Rapid increase in the number of coronavirites in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.