तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:23 AM2018-12-25T00:23:00+5:302018-12-25T00:23:34+5:30

नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे.

 Rapid preparations for the east of taluka | तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

Next

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू, हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण होऊन त्याची मशागत व उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  नाशिक तालुका पूर्व भाग व एकलहरे पंचक्रोशीतील सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरे गाव, गंगावाडी या भागातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीत व्यस्त आहेत. सध्या सर्वत्र जोरदार थंडी पडली असूून, या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होतो. कडाक्याच्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदे ही पिके जोमाने वाढतात व त्यांना पाणीही कमी लागते. त्यामुळे या रब्बी पिकांसाठी थंडी वरदान ठरते. मात्र द्राक्षबागांसाठी हीच थंडी मारक ठरते. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तर ज्या मण्यांची वाढ यापूर्वीच झाली आहे त्यांना थंडीमुळे तडे जातात. म्हणून द्राक्षबागांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी चहुबाजूने ग्रीन नेट व वरून जाळीदार नेटचे आवरण लावले जात आहे.
गहू,  हरभरा लागवड जोमात
रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गहू, हरभºयाची लागवड तालुक्याच्या पूर्व भागात केली जाते. येथील जमीन काळी कसदार व बारमाही पाण्याखाली असल्याने गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही ठिकाणी नोव्हेंबरच्या मध्यात गव्हाची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी गव्हाची पेरणी करीत आहेत. क्वचित ठिकाणी टोचन पद्धतीने हरभºयाची लागवड केलेली आहे.
नाशिकचा ऊस नगरकडे
नाशिक तालुक्यातील पूर्व भागात गोदावरी व दारणा नद्यांच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात ऊसलागवड करण्यात आली असून, आडसाली व सुरू ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांचे जत्थे ठिकठिकाणी शेतांमध्ये कुडाच्या व उसाच्या पाचटाच्या झोपड्या करून मुक्कामाला थांबले आहेत. दिवसभर ऊसतोड करून, तो ट्रकमध्ये भरण्याचे काम मजुरांमार्फत केले जाते. नाशिक परिसरातील साखर कारखाने बंद असल्याने सध्या आपला ऊस नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखान्यांचे गळीत सुरू होऊन परिसरात बºयापैकी ऊसतोड झाल्याने शेतात उरलेले पाचट तेथेच जाळण्यावर शेतकरी भर देत असून, पाचट जाळल्याने त्याची राख खोडव्याला खत म्हणून वापर केला जातो. पाणी भरल्यावर खोडवा पुन्हा जोमाने फुटतो, अशी शेतकºयांची धारणा आहे.
उन्हाळ कांद्याची तयारी
एकलहरे परिसरात उन्हाळ कांद्याच्या लागवडीची तयारी केली जात असून, त्यासाठी शेतकरी स्वत: रोपे तयार करीत आहे तर काही रोपे विकत आणून कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजूर उपलब्ध करून कांदा लागवड केली जाते.  यंदा कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा जाणवण्याची चिन्हे आहेत.

Web Title:  Rapid preparations for the east of taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.