तुरळक पावासामुळे खरीपाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:30 PM2019-08-04T23:30:32+5:302019-08-04T23:31:49+5:30
देवळा : देवळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरिपाकाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यात मध्यम स्वरपाचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते, व दमदार पावसाची प्रतिक्षा सर्वांना असतांना रविवारी पहाटे तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देवळा : देवळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरिपाकाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात मध्यम स्वरपाचा पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते, व दमदार पावसाची प्रतिक्षा सर्वांना असतांना रविवारी पहाटे तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दमदार पावसाची सर्वजण प्रतिक्षा करीत आहेत.
देवळा तालुक्यात आतापर्यंत रिमझीम पाऊस झालेला होता. त्यावरच शेतकº्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती. यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप पीके संकटात सापडली होती. परंतु या पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत.
दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे रविवारी देवळा येथे भरणाºया आठवडे बाजारात मात्र ग्राहकांची वाणवा दिसून आली.
फोटो - रविवार आठवडे बाजाराचा दिवस असून हि पावसामुळे बसस्थानकावर तुरळक गर्दी होती.
( 04देवळाबसस्टॅँड)