ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:51 PM2021-04-10T23:51:55+5:302021-04-11T00:08:41+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कोरोना लाटेमध्ये ग्रामीण भागातील काही गाव-पाड्यांनी कोरोनाला वेशीवरच थोपवले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट प्रचंड तीव्र असल्याने त्याचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.

गेल्या कोरोना लाटेतील कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात पुरेसा झाला नव्हता. तरीसुद्धा ग्रामप्रशासनाकडून सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्क, गाव पाड्यात प्रत्येक घरात वाटप केले गेले. त्यानंतर गावा-गावात बॅनर लावून कोरोनाची जनजागृती झाली. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना कुठेच जनजागृती किंवा मास्क, सॅनिटायझर वाटप होताना दिसत नाही. ग्रामपंचयातींकडूनही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला आलेला कोरोना प्रशासनाने विविध उपाययोजनेने आटोक्यात आणला. शहरात वाढत असलेला संसर्ग ग्रामीण भागात काहीसा कमी होता. टाळेबंदीच्या काळात संपूर्ण गावच्या गाव सील केल्यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला. मात्र, आता कोरोनाच्या ओसरलेल्या लाटेनंतर गाव,पाड्यातील नागरिक उदरनिर्वाहासाठी शहरात जात असल्यामुळे तेथील कोरोना गाव, खेड्यापाडयापर्यंत येऊन पोहचला आहे.
ह्य ब्रेक दी चेन ह्ण या मोहिमेंतर्गत शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, इतर काही दिवस शिथिल असल्यामुळे नागरिकांची रेलचेल होत असल्यामुळे कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊन खेडे, पाडेही हॉटस्पॉट ठरत आहेत.
लसीकरण वाढविण्याची गरज
ग्रामीण भागात लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाला अपेक्षित वेग आलेला नाही. लसीकरणाबाबत नागरिक उदासिन आहेत. काही भागात उत्साह आहे परंतु पुरेशी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागात लसपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे.