संचारबंदीत फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:37+5:302021-04-21T04:15:37+5:30
शहरात ‘ब्रेक द चेन’अंर्तगत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद असून गावातील महामार्ग व रस्त्यावरील वर्दळ मात्र ...
शहरात ‘ब्रेक द चेन’अंर्तगत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद असून गावातील महामार्ग व रस्त्यावरील वर्दळ मात्र थांबलेली नाही. त्यामुळे महसूल, पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्तरीत्या सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी मंगळवारी, (दि. २०) सकाळपासूनच विंचूर चौफुलीवर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याची मोहीम राबविली.
औषधनिर्माण अधिकारी अरुण चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल शिरसाठ, देवचंद राठोड यांनी १०२ लोकांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या. सुदैवाने यापैकी एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. याप्रसंगी प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकडे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, नगरपालिका अभियंता जनार्दन फुलारी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर पोलीस यंत्रणेने दंडात्मक कारवाई केली.
फोटो- २० येवला कोरोना
===Photopath===
200421\20nsk_34_20042021_13.jpg
===Caption===
फोटो- २० येवला कोरोना