बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:59 PM2019-02-05T18:59:47+5:302019-02-05T19:00:10+5:30

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.

Rapid water shortage at Changsali in Baglan taluka | बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

Next
ठळक मुद्दे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.
या गावात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिलावर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावाला तात्काळ टँकर मंजूर केला जावा अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.
चालू वर्षी संपूर्ण तालुक्याभरात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यामुळे तळाला गेल्या असून या गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी ह्या गावाचीही पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर तसेच गावातील कूपनलिका ह्या पूर्णपणे आटल्याने या गावापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात रहाणारे बहुतांश नागरिक हे शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला सध्यस्थीतीत आपली रोजीरोटी बुडवुन हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षापासुन या गावाला चालू असलेला टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून गावाला सद्यस्थितीत पाणीटचांईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षापासुन बंद झालेला टँकंर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीला करावी लागली असून ग्रामपचांयतीच्या वतीने बागलाण पचांयत समितीकडे टँकंर मागणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजुर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे गावासाठी दहा वर्षांपासून चालू असलेला टँकर बंद झाला होता.
गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असुन या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहीरीच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय उरलेला नाही. या करीता शासनाने वेळीच सहानुभुतीपुर्वक विचार करुन गावासाठी पाण्याचे टँकर चालुकरावे लागत आहे.
 

Web Title: Rapid water shortage at Changsali in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.