तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:00 AM2019-02-06T01:00:05+5:302019-02-06T01:00:24+5:30
वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे.
वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे.
या गावात सद्य:स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिला वर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावासाठी तत्काळ टँकर मंजूर केला जावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.
चालू वर्षी तालुकाभरात कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना तळाला गेल्या असून, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी गावासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेची विहीर व इतर कूपनलिकांनी तळ गाठल्याने मोठे जलसंकट उभे ठाकले आहे. गावातील बहुतांश नागरिक शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला आपली रोजीरोटी बुडवून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजूर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे दहा वर्षांपासून सुरू टँकर बंद झाला होता.
गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असून, या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहिरी आटल्यामुळे टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय नाही.टॅँकरसाठी प्रस्ताव सादर
पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षांपासून गावाला सुरू असलेले टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून, गावाला सद्य:स्थितीत पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षांपासून बंद झालेला टँकर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीने बागलाण पंचायत समितीकडे केली असून, तसा प्रस्ताव सादर केला आहे.