रासाका बचाव समितीचे साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 08:36 PM2020-12-01T20:36:45+5:302020-12-02T00:02:24+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील रासाका साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निविदा काढावी आणि कारखाना सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याप्रमुख मागणीसाठी रासाका कृती बचाव समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

Rasaka Rescue Committee's chain hunger strike continues | रासाका बचाव समितीचे साखळी उपोषण सुरू

रासाका कृती समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण.

Next
ठळक मुद्देसायखेडा : कारखाना सुरू करण्याची निविदा काढण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील रासाका साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निविदा काढावी आणि कारखाना सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याप्रमुख मागणीसाठी रासाका कृती बचाव समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. निफाड तालुक्यातील निसाका आठ वर्ष, तर रासाका तीन वर्षांपासून बंद आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान कारखान्याचे भांडवल वापरले जाते सर्वच उमेदवार दोन्ही कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देतात, मात्र तांत्रिक अडचण आणि कोटी रुपयांचे कर्ज यामुळे कारखाना वर्षानुवर्षे बंद आहे.

कारखाना सुरू होण्यासाठी अनेक वेळा शासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. मात्र यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, त्यामुळे अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. निफाड तालुक्यातील निसाका आणि रासाका बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परवड होत आहे. नगर जिल्ह्यातील कारखान्याना ऊस द्यावा लागतो. ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. रासाका बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना सुरू व्हावा यासाठी उपोषणास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपोषणकर्त्यांची मर्यादा घालून दिली आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या मागण्या मंत्रालयस्तरावरील असल्यामुळे शासन दरबारी निवेदन आणि माहिती पाठविणार असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले.
मात्र जोपर्यंत कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासन निविदा काढत नाही. तो पर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष धोंडीराम रायते, विकास रायते, दत्तू मुरकुटे, राजेंद्र मोगल, सुयोग गिते अनिरुद्ध पवार, शिवराज थेटे, सचिन वाघ, हेमंत सानप, बाबूराव सानप, हर्षल काळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Rasaka Rescue Committee's chain hunger strike continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.