म्हाळसाकोरे येथे रासाकाचे गट कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:01+5:302021-09-22T04:16:01+5:30
गोदाकाठ भागात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान यामुळे प्रमुख पीक म्हणून ऊस घेतले जाते. त्यामुळे नदीकाठच्या ...
गोदाकाठ भागात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान यामुळे प्रमुख पीक म्हणून ऊस घेतले जाते. त्यामुळे नदीकाठच्या गावात उसाचे क्षेत्र मोठे आहे. या भागातील ऊस हा साखर निर्मितीसाठी चांगला आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस कारखाने बंद असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती. अशोक बनकर पतसंस्थेने भाडेतत्त्वावर रासाका चालवायला घेतला आहे. त्याची डागडुजी आणि अंतर्गत कामे सुरू आहेत. करंजगाव, भेंडाळी, भुसे, चापडगाव, मांजरगाव, तारुखेडले, करंजी, तामसवाडी, शिंगवे, सोनगाव, खानगाव या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्ता कारखानासंदर्भात असणारी सर्व कामे गटकार्यालयातून करून मिळणार असल्यामुळे वेळ आणि खर्च वाचणार आहे. यावेळी आमदार दिलीप बनकर, नंदू सांगळे, दत्तू मुरकुटे, गणपत हाडपे, रामनाथ मुरकुटे, संजय हाडपे उपस्थित होते.