विडंबनात्मक कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:41 AM2018-09-29T00:41:11+5:302018-09-29T00:41:36+5:30
रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे. शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी औरंगाबादकर सभागृह येथे सार्वजनिक वाचनालय आणि कुटुंब रंगलय काव्यात यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र. के. अत्रे कट्ट्याअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
नाशिक : रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे.
शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी औरंगाबादकर सभागृह येथे सार्वजनिक वाचनालय आणि कुटुंब रंगलय काव्यात यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र. के. अत्रे कट्ट्याअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध कवींनी आपल्या कवितांमधून आजच्या जमान्यात मुलींच्या नवºया मुलाकडच्या अपेक्षा, मोबाइलमुळे बदललेले वर्तन, मोदी सरकार आदी विविध विषयांवर उपहासात्मकरीत्या प्रकाश टाकला. सादरीकरणासाठी प्रत्येकाला पाच मिनिटे वेळ देण्यात आला होता. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, श्रीकांत बेणी, संयोजक अरु ण नेवासकर, अनिरु द्ध जोशी आदी उपस्थित होते. प्रवीण दोषी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आपण आज धावपळीच्या जगात हास्यच विसरून गेलो आहोत. त्यामुळे सोशल मीडियावरील जोक, गमतीजमती ही कमी भरून काढायचा प्रयत्न करतात. दैनंदिन जीवनात कामे पार पाडताना हास्यविनोदाचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बक्षीस वितरण
विसूभाऊ बापट यांनी जीवनातील हास्याचे महत्त्व विशद केले व या कट्ट्याच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक, शारदा गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. उत्कृष्ट सादरीकरण करणाºयांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.