रासेगावला किरकोळ वादातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:20 AM2018-05-26T01:20:18+5:302018-05-26T01:20:18+5:30

तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी होत एका युवकाचा निर्घृण खून झाला असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, तीन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 Rasgaawa's murder of minor youth | रासेगावला किरकोळ वादातून युवकाचा खून

रासेगावला किरकोळ वादातून युवकाचा खून

Next

दिंडोरी : तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी होत एका युवकाचा निर्घृण खून झाला असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, तीन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रासेगाव येथील उत्तम गुलाब लहांगे (२२) व सुनील संजय लहांगे (२२) हे गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रासेगाव येथे इंदोरे रोडने फिरायला जात असताना संजय सुकदेव बेंडकुळे याने चारचाकी गाडीने येत कट मारला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता पाण्याच्या टाकीजवळ वाद होत संजय सुकदेव बेंडकुळे, संदीप संजय बेंडकुळे, भावराव पुंडलिक बेंडकुळे, तानाजी हिरामण बोके (सर्व रा. रासेगाव) यांनी वाद घालत संजय बेंडकुळे व तानाजी बोके यांनी सुनील संजय लहांगे याचे हात पकडून ठेवत भावराव बेंडकुळे याने सुनीलवर तलवारीने पोटावर वार केला. मात्र तो चुकवला. यानंतर संजय बेंडकुळे याने तलवारीने त्याच्या पोटावर वार केला. त्यात सुनील लहांगे गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री १२.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
दिंडोरी पोलिसांनी उत्तम गुलाब लहांगे याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, भावराव पुंडलिक बेंडकुळे यास अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, प्रभारी अधिकारी एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी अधिक तपास करीत आहेत.
मृतदेह आरोपीच्या घरासमोर
खुनी हल्ला झालेल्या सुनील लहांगे या युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रात्री पोलिसांनी फिर्याद नोंदून न घेतल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. संशयित आरोपी संजय सुकदेव बेंडकुळे याच्या घरावर हल्ला करत तेथेच खड्डा खोदत मृत युवकाचे दफन करण्याची भूमिका घेत घरासमोर तब्बल चार तास ठिय्या दिला. सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी एम. सुदर्शन यांनी नातेवाइकांची समजूत काढत आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेत सुनील लहांगे याच्यावर रासेगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यविधी केला. पोलिसांनी रासेगाव येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
 रासेगाव येथे गुरु वारी सायंकाळी दोन गटांत वाद होऊन त्यात एका युवकावर खुनी हल्ला करण्यात आला. यात जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले. यानंतर दोन्ही गट दिंडोरी पोलीस ठाण्यात आले. त्यातील ज्या गटाने हल्ला केला त्यातील एकाने उमराळे बु. पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना किरकोळ वाद असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या गटाने आमचा नातेवाईक युवक सुनील लहांगे याच्यावर खुनी हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी असल्याचे सांगत फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी तसा काही प्रकार नाही, किरकोळ घटना आहे असे सांगत जखमीची तब्बेत व्यवस्थित आहे असे सांगुन आपसात मिटवून घेण्याचा अनाहूत सल्ला दिला.
मध्यरात्रीपर्यंत २० ते २५ महिला, पुरुष नातेवाईक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे आरोपींविरूद्ध फिर्याद दाखल करून घेत तत्काळ कारवाई करण्यासाठी गयावया करत होते. मात्र जखमी सुनीलची तब्बेत ठीक आहे असे सांगत जिल्हा रु ग्णालयातून वैद्यकीय अहवाल आल्यावर कारवाई करू, असे शिंदे यांनी सांगून नातेवाइकांना घरी जायला सांगितले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही वृतांकन करण्यापासून रोखले. वरिष्ठ अधिकाºयांनाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अखेर रात्री साडेबाराच्या सुमारास जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची खबर मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. तातडीने रासेगाव येथे पोलीस पथकाने धाव घेत संशयित आरोपींच्या घरी धाड टाकली व एक संशयिताला ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपीसह दोन जण फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title:  Rasgaawa's murder of minor youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून