रासबिहारी शाळेत लोकनृत्य स्पर्धेत मुलांनी केली धम्माल
By admin | Published: September 21, 2016 12:24 AM2016-09-21T00:24:56+5:302016-09-21T00:25:33+5:30
रासबिहारी शाळेत लोकनृत्य स्पर्धेत मुलांनी केली धम्माल
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील विविध लोककलेवर आधारित नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा हाउसनुसार घेण्यात आली आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अनिवार्य होती. यात हिमाचल प्रदेशचे नत्ती, गोव्याचे लोकनृत्य, राजस्थानचे घुमरो, गुजराथचे हुडो, आसामचे बीहू, तामिळनाडूचे कुम्मी, छत्तीसगडचे मव्हा झारे, बंगाली लोकनृत्य, पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा असे एकूण १२ लोकनृत्य विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. संक्रमण, नृत्याला अनुसरून पेहराव, नृत्य दिग्दर्शन, हाव-भाव, स्टेज व्यवस्था इत्यादि निकषांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली. ‘भारतातील लोककला आणि तेथील नृत्यप्रकार मुलांना ज्ञात व्हावे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा’ ही स्पर्धा घेण्यामागची पार्श्वभूमी होती. विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. कथ्थक विशारद शर्वरी तालेकर परीक्षक म्हणून लाभल्या. नभेश दायमा, आदित्य म्हसाने, प्रणव गीते, पीयूष दिघे यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. लोकनृत्य स्पर्धेतील अव्वल आलेल्या हाउस आणि नृत्यप्रकारांची नावे इयत्तेनुसार खालीलप्रमाणे:- इ. ३ री :- एमराल्ड हाऊस - गोव्याचे लोकनृत्य इ. ४ थी :- रूबी हाऊस - गुजराथचे हुडो नृत्य इ. ५ वी :- सफायर हाऊस - पंजाबचा भांगडा यांनी यश मिळविले.