रस्सीखेच : भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस आणि अपक्षांमध्ये टशन नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:09 AM2017-12-02T00:09:45+5:302017-12-02T00:40:23+5:30
त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जनतेतून होणाºया थेट निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत असून भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे.
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जनतेतून होणाºया थेट निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत असून भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात नगराध्यक्षपदाच्या जनतेतून होणाºया थेट निवडणुकीसाठी तीन राजकीय पक्षांचे उमेदवार पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. त्यात भारतीय जनता पार्टीचे पुरुषोत्तम बाळासाहेब लोहगावकर, काँग्रेसचे उमेदवार सुनील बबनराव अडसरे, शिवसेनेचे धनंजय यादवराव तुंगार तसेच भाजपाने तिकीट नाकारलेले बंडखोर अॅड. पराग गिरीश दीक्षित हेही नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी करीत आहेत. नगराध्यक्षपदासाठी जनतेतून निवडणुकीची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरकरांना थेट निवडणुकीतून नगराध्यक्ष निवडीची पद्धत नवी नाही. यासाठी शहरात भारतीय जनता पार्टीचे वजन वाढलेले असले तरी काही भागात काँग्रेसचा प्रभाव आहे. हा भाग काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे शहरात अजूनही लोकसभा, विधानसभेत काँग्रेसची टक्केवारी वाढलेली असत. तसेच सुनील अडसरे यांनी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. गेली दहा वर्षे ते स्वत: व पाच वर्षे त्यांच्या धर्मपत्नी यशोदा अडसरे यादेखील मागच्या टर्ममध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे सुनील अडसरे पालिका कामकाज पाहण्याच्या दृष्टीने अनुभवी उमेदवार आहेत. काँग्रेसच्या पारंपरिक मतांचा, मराठा समाजाच्या मतांचा, आदिवासी बांधवांच्या, ब्राह्मण वर्गातील काही मतांचा व्यक्तिगत संबंधामुळे त्यांना लाभ होऊ शकतो. अर्थात शेवटी परिस्थितीवर मतांची विभागणीदेखील होऊ शकते. नगराध्यक्षपदासाठी पालिकेचे सभागृह गाजविणारे अभ्यासू नगरसेवक म्हणून ख्याती असलेले धनंजय यादवराव तुंगार हे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. तुंगार यांना त्यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी नगराध्यक्ष व सध्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त असलेले यादवराव तुंगार यांचा वारसा आहे. अशा पार्श्वभूमीवर धनंजय तुंगार हेदेखील मराठा समाजाचे असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काही मते काँग्रेसचे सुनील अडसरे, तर काही मते धनंजय तुंगार यांना विभागली जाऊ शकतात. तथापि, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र हे मराठा समाजाचे आहेत. तर भाजपामध्येदेखील बरेच कार्यकर्ते मराठा समाजाचे आहेत. त्यांचा लाभ भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम लोहगावकर हेही घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनंजय तुंगार यांचा मतदार वर्गही ठरलेला आहे. मित्र परिवार मोठा आहे. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेते मंडळींनी हजेरी लावली होती. तिसरे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे पुरुषोत्तम बाळासाहेब लोहगावकर हे असून, ते मूळचे भाजपाचे ! त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले. या वेळेस भारतीय जनता पक्षात सर्वसामान्यांचा ओघ भाजपामध्ये वाढू लागल्याने पालिका निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व वाढू शकते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मेळाव्यासाठी आलेले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस पुरुषोत्तम लोहगावकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. या दोन्हीही पक्षामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला. त्याचा परिणाम त्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीला लाभ मिळू शकतो. त्यांना नगराध्यक्ष- पदाचा लाभही दोन वेळा पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या प्रयत्नांमुळेच घेता आला. पालिका राजकारण लोहगावकर यांना नवीन नाही आणि भाजपासारख्या पक्षाने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन एक प्रकारे पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्याचा लाभ लोहगावकर यांना मिळू शकतो.