घुबडसाका पाडयावर अवतरले राष्ट्रपुरूष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:13 PM2020-01-27T22:13:05+5:302020-01-28T00:31:26+5:30
भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते.
पेठ : तालुक्यातील भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते.
जि.प.प्रा.शाळा घूबडसाका येथ’ प्रजासत्ताक दिना निमीत्त ध्वजवंदन व वार्षिक सांस्कृतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरीत विविध राष्ट्रपुरु षांच्या वेषभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले. सदर कार्यक्र माचे आकर्षण होते ते प्रभात फेरी मध्ये असलेले म.गांधीजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सांस्कृतिक कार्यक्र माध्ये घेण्यात आलेला सर्वात आकर्षक होती ती म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत नाटिका हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई सर्वांना महात्मा गांधीजी कशा पद्धतीने एकत्र केले. या धर्तीवर आधारित मूक नाटिका.देश भक्तीपर गितावर आधारित लेझीम नृत्य,समूहनृत्य,वैयक्तीक नृत्य व भाषण आदी उपक्र म राबवण्यात आले. याप्रसंगी सरपंच गणपत गहले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश गहले ,जना मोरे,दिलीप राऊत, अंबादास गायकवाड,गणपत करपट, रमेश करपट,पंडित मोहंडकर,श्रवण गावित, एकनाथ गावित,जनार्धन राऊत, योगेश जाधव,भास्कर जाधव, नंदू गावित,देविदास मोहंडकर,पुंडलिक जाधव,देविदास गायकवाड, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक छगन भोये यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचलन तर सचिन इंगळे यांनी आभार मानले.