राष्ट्रवादी युवकचा ‘जवाब दो’ मोर्चा महापालिकेवर धडक : सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:20 AM2017-12-16T01:20:16+5:302017-12-16T01:21:10+5:30
विविध समस्या घेऊन शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा शुक्रवारी (दि. १५) महापालिकेवर येऊन धडकला.
नाशिक : ‘वाह रे मोदी तेरा खेल, लूट गयी जनता विकास हुआ फेल’, ‘भाजपा के दिन आ गये अच्छे, जनता को जो खा गये कच्चे’ अशा घोषणा देत शहरातील विविध समस्या घेऊन शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा शुक्रवारी (दि. १५) महापालिकेवर येऊन धडकला. महापालिकेने समस्यांची सोडवणूक केली नाही तर आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला.
शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने आयोजित या मोर्चाला बी. डी. भालेकर मैदानापासून सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, रायुकॉँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, मनपातील गटनेते गजानन शेलार, अर्जुन टिळे, राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचे नियोजन होते. त्या पार्श्वभूमीवर मोर्चाचे ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले. प्रत्यक्षात हजाराच्या आसपास मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर कार्यकर्त्यांसाठी पाण्याचे पाऊचही ठेवण्यात आले होते. मोर्चाच्या अग्रभागी ताशा वाजविला जात होता.