राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येवल्यात विजयादशमीचे सघोष संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 09:40 PM2019-10-08T21:40:45+5:302019-10-08T21:41:02+5:30
येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी निमित्त येवला शहरातून संचलन झाले. शस्त्रपूजन उत्सव होवून उत्सव संपन्न झाला.
येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी निमित्त येवला शहरातून संचलन झाले. शस्त्रपूजन उत्सव होवून उत्सव संपन्न झाला.
संघटीत सज्जन शक्तीचे दर्शन समाजाला व्हावे यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संचलनात स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. प्रारंभी घोड्यावर भगवा ध्वज घवून बसलेला स्वयंसेवक व त्या पाठोपाठ सुमारे ३०० गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलन शहरातील प्रमुख मार्गावरून तासभर संचलन केले. शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवकांचे स्वागत केले. स्वागतासाठी शहरात रांगोळ्या काढल्या होत्या.
त्यानंतर शहरातील मुरलीधर मंदिरात विजयादशमी उत्सव सुरु झाला. कार्यक्र मप्रसंगी पुणे येथील प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, तालुका संघचालक मुकुंदराव गंगापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. हेगडेवार यांच्या प्रतिमेचे व शस्त्रांचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रताप दाभाडे यांनी सामुदाईक पद्य म्हटले. रविंद्र भावसार यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. अमृत वचन यामधून प्रसाद भावसार यांनी मातृभूमीचे महत्व सांगितले. अथिती परिचय व आभार प्रदर्शन अनिल सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख अतिथी यशोवर्धन वाळिंबे यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी शक्तीची उपासना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बाळासाहेब कापसे, मयूर गुजराथी, दिनेश मुंदडा, विक्र म गायकवाड, श्रीपाद पटेल, सुनिल सस्कर, सुभाष सस्कर, विजय चंडालिया, अरविंद जोशी, डॉ. शैलेश भावसार, सुरेश शेटे, प्रताप दाभाडे, प्रदिप निकम, देविदास भांबारे, अतुल काथवटे, तरंग गुजराथी, भोला वाडेकर, आप्पा घाटकर, ज्ञानेश्वर बुटे, राम कुलकर्णी, आबा देशमुख, गोरख काळे, दिपक शेळके आदीसह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.