जिल्ह्यात रसिका शिंदे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:34 AM2018-06-09T02:34:04+5:302018-06-09T02:34:04+5:30
नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे.
नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्णात सर्वाधिक निकाल लागला असून, जिल्ह्णातील परीक्षेला प्रविष्ट ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.९६ व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के आहे. विभागातील धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ८७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात ८५.५१ टक्के मुले व ९०.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
जळगावमध्ये १३१ परीक्षा केंद्रांवर ६० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी मुलांमध्ये ८५.७८ टक्के तर मुलींमध्ये ९१.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबारमध्ये ४३ परीक्षा केंद्रांवर २० हजार ४३१ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत मुलांमध्ये ७९.०६ व मुलींमध्ये ८२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोडक्यात, दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनीच टॉपर ठरल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.१८ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी होत चालली असली तरी यावर्षी विभागात नाशिक जिल्ह्णाचा निकाल अव्वल राहिला असून, नंदुरबारचा निकाल मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वात कमी लागला आहे. दरम्यान, जुलै २०१८
विभागात नाशिक प्रथम
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्णांमध्ये नाशिकचा निकाल सर्वाधिक ८८.४७ टक्के लागला असून, धुळे ८७ टक्के, जळगाव ८८.०८ टक्के व नंदुरबारचा निकाल ८०.७४ टक्के लागला आहे. मध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाची असून, त्यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी सांगितले.