डांगसौदाणेत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:54 PM2020-09-17T12:54:06+5:302020-09-17T12:54:14+5:30
डांगसौंदाणे : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी डांगसौंदाणे कळवण रस्त्यावरील बुंधाटे चौफुलीवर पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
डांगसौंदाणे : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी डांगसौंदाणे कळवण रस्त्यावरील बुंधाटे चौफुलीवर पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी या आशयाचे निवेदन सटाणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना देण्यात आले. निवेदन पोलीस कमर्चारी निवृत्ती भोये यांनी स्वीकारले. केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. शेतक-यांवर आर्थिक संकटात असताना निर्यात बंद करणाºया सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. सरकारने अचानक निर्यात बंदी आणल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. एका बाजूला निर्यातबंदीचे संकट तर दुसºया बाजूला शेती मालाला बाजार भाव नाही अशा अस्मानी व सुलतानी संकटांचा बळीराजा सामना करीत असताना कुठेतरी शेतकरी वर्गाला कांद्याच्या माध्यमातून दिलासा मिळाला होता. मात्र अचानक झालेल्या निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी डांगसौंदाने कळवण रस्त्यावर शेतकºयांनी रास्ता रोको करत प्रशासनाला निवेदन दिले.