भाजपचे कळवणला रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:40+5:302021-06-27T04:10:40+5:30
--------------- ओबीसी आरक्षण संदर्भात नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, दीपक खैरनार प्रभाकर ...
---------------
ओबीसी आरक्षण संदर्भात नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, दीपक खैरनार प्रभाकर निकम विकास देशमुख सुधाकर पगार नंदकुमार खैरनार निंबा पगार कृष्णा महाराज, सतीश पगार आदी. (२७ कळवण बीजेपी)
------------------
पिंपळगावी सर्वपक्षीयांकडून निवेदन
पिंपळगाव बसवंत : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी येथील सर्वपक्षीयांकडून पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षाच्यावतीने पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश खोडे, राजेंद्र खोडे, सतीश मोरे, बापू पाटील, प्रशांत घोडके, गोविंद कुशारे, चिंधू काळे, बाळासाहेब आंबेकर, मयूर गावडे, दीपक पुंड आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------
घोटी महामार्गावर आंदोलन
घोटी : ओबीसींचे स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी इगतपुरी तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक-सिन्नर चौफुलीवर आक्रोश आंदोलन करून महामार्ग रोखण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उत्तम भोसले, अरुण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तम भोसले, अरुण गायकर, बाळासाहेब कुकडे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, बाळासाहेब वालझाडे, संतोष सोनवणे कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर कडू, निवृत्ती कतोरे, गणेश कवटे, सुदाम भोर, विजय झनकर, मल्हारी गटकळ, शशिकांत पवार, भोलानाथ चव्हाण, राजेंद्र भटाटे, प्रकाश तोकडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (२७ घोटी)
===Photopath===
260621\26nsk_10_26062021_13.jpg
===Caption===
२७ कळवण बीजेपी, २७ घोटी