केंद्र शासनाच्या निषेधार्थ नामपूरला रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:37 PM2020-03-03T16:37:30+5:302020-03-03T16:37:57+5:30
नामपूर : केंद्र शासनाच्या निषेध करण्यासाठी नामपूर पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील नामपूर- मालेगांव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमोर तासभर वाहतूक पुर्णत: खोळंबली होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
कांद्यावरील निर्यात मूल्य कायम शून्य टक्के करावे, पुढील काळात कांद्यावर निर्बध आणू नयेत, म्यानमारमधून आयात मका भारतात आणू नये त्या मूळे भारतातील शेतकर्यांच्या मक्याला दर मिळत नाहीत, शासकीय मका खरेदी १७४० रूपये दराने सुरू करावी आदी मागण्यांसाठी सर्व परिसरातील शेतकरी एकत्र आले होते. संतप्त शेतकºयांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. सदर रास्तारोको आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नायब तहसिलदार नेरकर व मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रयत क्र ांती संघटनेचे नेते दिपक पगार यांनी बळीराजास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळणे गरजेचे असल्याचे सांगून केंद्राने कांद्यांच्याबाबतीत हस्तक्षेप करणे थांबवावे असे आपल्या भाषणात सांगितले. तसेच कांद्यावरील निर्यातमुल्य शून्य करावे व मक्याचे बाबतीतही राज्यकर्त्यांनी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही पगार यांनी यावेळी सांगितले. अविनाश सावंत यांच्यासह अन्य वक्त्यांनीही यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन केले. उप निरीक्षक स्वप्नील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.