मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

By Admin | Published: November 17, 2016 11:02 PM2016-11-17T23:02:31+5:302016-11-17T23:05:47+5:30

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

Ratan Kumar Icham as the district president of MNS | मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी रतनकुमार इचम

googlenewsNext

 घोटी : नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी
मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी इचम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे
प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलढिकले, सरचिटणीस मनोज चव्हाण आदि उपस्थित होते.
मनसेच्या नाशिक जिल्हा ग्रामीणच्या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण समजली जाते.
दरम्यान, या नियुक्तीनंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी स्पष्ट केले की, मनसेच्या स्थापनेपासून पक्षनिष्ठा ठेवून आपण पक्षवाढीकरिता सक्रिय आहोत. या माध्यमातून अनेक आंदोलने करून अनेक प्रश्न मार्गी लावले. यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्याची कदर करून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. या विश्वासाला कदापि तडा जाऊ न देता आगामी काळात पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करू. तसेच होऊ घातलेल्या नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत सत्ता आणण्यासाठी आपण नियोजन करू, असे ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Ratan Kumar Icham as the district president of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.