कोजागरीनिमित्त दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:12 AM2018-10-24T01:12:13+5:302018-10-24T01:12:43+5:30

कोजागरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गरमागरम, मसालेदार, घट्ट दुधाचा आस्वाद म्हणजे आनंदाची पर्वणीच. ही पर्वणी साधण्यासाठी नाशिककरांनी मंगळवारी (दि. २३) मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी केल्याने वेगगवेगळ्या गोठ्यांवर आणि दूधविक्री केंद्रांवर दुधाचे भाव ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले.

The rate of milk at Kozagiri is up to 80 rupees | कोजागरीनिमित्त दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत

कोजागरीनिमित्त दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत

Next

नाशिक : कोजागरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गरमागरम, मसालेदार, घट्ट दुधाचा आस्वाद म्हणजे आनंदाची पर्वणीच. ही पर्वणी साधण्यासाठी नाशिककरांनी मंगळवारी (दि. २३) मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी केल्याने वेगगवेगळ्या गोठ्यांवर आणि दूधविक्री केंद्रांवर दुधाचे भाव ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले.  नाशिकमधील दूधबाजारात ६० ते ६५ रुपयांनी विकल्या जाणाऱ्या दुधाला कोजागरी पौर्णिमेमुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने स्थानिक दूध विक्रेत्यांसह बाहेरगावहून आलेल्या व्यावसायिकांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर १५ ते २० रुपये वाढ केली. त्यामुळे मंगळवारी (दि. २२) सकाळी दुधाचे दर ७० ते ७५ रुपयांपर्यंत तर सायंकाळी थेट ७५ ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. कोजागरीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासूनच दुधाची दरवाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, पिशव्यांमध्ये मिळणाºया दुधाचे भाव स्थिर असल्याने अनेकांनी दुधाच्या पिशवी खरेदी करण्याला प्राधान्य दिले. अनेक खासगी डेअरीचे कर्मचारी गावात जाऊन दूध थेट संकलित करीत असल्याने गावात दुधाचा तुटवडा निर्माण झाला. पर्यायाने दूध वितरणावर परिणाम झाला. दूध संघ, संस्थांना दूध संकलनावरही २५ टक्क्यांपर्यंत परिणाम झाला. तर बाजारपेठेत सुमारे दीडपट मागणी वाढल्याने सुमारे ४० ते ४५ टक्के दुधाची तूट निर्माण झाल्याचे दिसून आले. तर अनेक ांना कोजागरी उत्सवासाठी एकाच ठिकाणी आवश्यक तेवढे दूध मिळाले नसल्याने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दूध संकलित करून कोजागरी पौर्णिमा साजरी केली. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी शास्त्रीय गायन, सुगम संगीताच्या मैफलींचे आयोजन करण्यात आले होते.  म्हशीच्या दुधाचा प्रतिलिटरचा दर ७० ते ८० रुपये आहे. तर गायीच्या दुधाला ५५ ते ६० रुपयांचा भाव मिळाला. दर कोजागरी पौर्णिमेला शासकीय दूध डेअरीकडून दूध पुरवठा करण्यात येतो; परंतु सरकारी डेअरीमध्ये दूध संकलित होत नसल्याने नागरिकांना १५ ते २० रुपये अधिक दराने दुधाची खरेदी करावी लागली.

Web Title: The rate of milk at Kozagiri is up to 80 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.