नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’; जिल्ह्यात वाढणार नवीन २४२ दुकाने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:23+5:302021-09-22T04:17:23+5:30
नाशिक : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ ...
नाशिक : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार असून जिल्ह्यात नव्याने २४२ दुकाने सुरू होणार आहेत.
या नव्या जाहीरनाम्यामुळे ग्रामीण भागातील आजमितीस रद्द असलेल्या, राजीनामा दिलेल्या व विविध कारणांमुळे नवीन रास्त भाव दुकानांना परवानगी दिली जाणार आहे. यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसाहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था तसेच नोंदणी झालेल्या सार्वजनिक तसेच सार्वजनिक न्यास यांच्या माध्यमातून रेशन दुकाने सुरू करता येणार आहेत. याबाबतची कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील एकूण रास्तभाव दुकाने : २६०९
शहरी : २०१०
ग्रामीण : ५९९
--इन्फो--
कोठे किती वाढणार
नाशिक : ११
इगतपुरी : १७
सिन्नर : १५
दिंडोरी : १९
पेठ : १३
सुरगाणा : २२
त्र्यंबकेश्वर : १६
नांदगाव : ८
बागलावण : १६
कळवण : २१
देवळा : ६
येवला : ८
मालेगाव : १५
चांदवड : १९
निफाड : ३६
--कोट--
शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामीण भागासाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात २४२ नवीन दुकाने सुरू होण्यासाठीची प्रक्रिया राबविली जात आहे.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
210921\21nsk_38_21092021_13.jpg
डमी रेशन