शिधापत्रिका प्रश्नी तहसिलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 00:42 IST2021-06-09T22:08:00+5:302021-06-10T00:42:09+5:30
येवला : तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमीत धान्य पुरवठा व्हावाआदी प्रमुख मागणीसाठी आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

शिधापत्रिका प्रश्नी तहसिलदारांना निवेदन
येवला : तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमीत धान्य पुरवठा व्हावाआदी प्रमुख मागणीसाठी आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अनेक घटकांना अद्यापही शिधापत्रिका मिळालेल्या नसल्याने त्यांना स्वस्त धान्यांपासून वंचित रहावे लागत आहे. अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या प्रश्नी तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केले जाईल असे निवेनदनात म्हटले आहे.
निवेदनावर आदिवासी भटके व विमुक्त जाती जमाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ, जिल्हाप्रमुख धीरजसिंग परदेशी, स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष शेरु मोमीन, सुभाष शिकलकर, अमजद अन्सारी, सलीम अन्सारी, सागर बाबर, दर्शन भिंगारकर, शाकीर शेख, नीरज पाटोदकर, शरद लोकरे, मायाराम नवले, संजय आचारी, पिंटू कुमावत, गुलाब कमोदकर, आशरफ मोमीन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.