काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:36 AM2018-11-27T01:36:41+5:302018-11-27T01:37:16+5:30

रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे.

 Ration rice seized in black market | काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त

काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त

googlenewsNext

मालेगाव : रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कंटेनरसह तांदूळ ताब्यात घेतला आहे. येथील महसूल विभागाकडून तांदूळाची पडताळणी करण्यात आली असून, सदरचा तांदूळ रेशनिंगचा असल्याचे उघडकीस आले आहे.
धुळे येथून मुंबईकडे रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, हवालदार किशोर नेरकर यांना मिळाली होती. त्यानुसार चंदनपुरी शिवारातील मनमाड चौफुलीवर किल्ला पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एमएच ४६ एएच २१२८) ही अडवून त्याची तपासणी केली. कंटेनरमध्ये ५० किलो वजनाचा तांदूळ पांढºया रंगाच्या पिशवीत भरलेल्या आढळून आल्या. सदर तांदुळाबाबत चालक सुनील कोल्हार याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कंटेनरमध्ये ४६० गोण्या (२३० क्विंटल) तांदूळ मिळून आला. किल्ला पोलिसांनी येथील तहसीलदार ज्योती देवरे, पुरवठा शाखेचे पुरवठा अधिकारी सावणे यांच्याकडून तपासणी करून घेतली.  सदरचा तांदूळ रेशनिंगचा असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.  सदर कारवाई पोलीस निरीक्षक पटारे, नेरकर, पोलीस उपनिरीक्षक डोखे, हवालदार दिपक पाटील, निलेश निकाळे, रतिलाल राठोड आदिंनी केली. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल धुळे येथील जय आनंद फुट इंडस्ट्रीज युनिट ३ चा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title:  Ration rice seized in black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.