रेशन घोटाळ्यातील संशयित न्यायालयात
By admin | Published: December 15, 2015 12:13 AM2015-12-15T00:13:20+5:302015-12-15T00:14:25+5:30
बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केलेल्या आठही संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि़१५) संपणार आहे़ या सर्वांना विशेष मोक्का
नाशिक : बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केलेल्या आठही संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि़१५) संपणार आहे़ या सर्वांना विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे़ दरम्यान, यातील प्रमुख संशयित व मास्टरमाइंड जितूभाई ठक्कर अद्याप हाती लागलेला नाही़
या घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर हे २९ नोव्हेंबरला वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले होते़ या चौघांना न्यायालयाने प्रथम ९ व त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ रेशन घोटाळ्यासाठी संशयितांनी सुमारे दहा-अकरा बोगस कंपन्या स्थापन केल्या़ यासाठी बँकेत खोट्या कागदपत्रांद्वारे खाती उघडण्यात आली़ दरम्यान, यातील संशयित लक्ष्मण धरमसी पटेल, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले व अरुण घोरपडे हे टप्प्याटप्प्याने शरण आले़ या सर्वांना न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्वांची कोठडीची मुदत संपल्याने या सर्वांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)