घोरपडेंच्या अटकेने रेशन दुकानदार धास्तावले
By admin | Published: November 30, 2015 11:43 PM2015-11-30T23:43:46+5:302015-11-30T23:45:21+5:30
मिलीभगत : धान्य काळाबाजाराचे होणार पोलखोल
नाशिक : जिल्ह्णातील रेशन धान्याच्या काळ्याबाजारात गुंतलेल्या घोरपडे बंधंूभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर या धंद्यात वर्षानुवर्षे घोरपडेंना साथ देणारे रेशन दुकानदार धास्तावले असून, अनेकांनी त्यांच्याशी आपले संबंध नव्हतेच, असा पवित्रा घेतला आहे.
संपत घोरपडे व त्याच्या भावाविरुद्ध मोक्कान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी या साऱ्या प्रकरणाला चालना मिळाली असली तरी, रेशनचा वर्षानुवर्षे काळाबाजार करून त्यातून घोरपडेंनी जमविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘माया’चा मार्ग पोलिसांना दाखविण्यात याच धंद्यातील काहींनी मदत केली आहे. घोरपडे यांचे जिल्ह्णातील रेशन दुकानदारांशी, तसेच रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांशीही संबंध तर होतेच, परंतु शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेल्या संंबंधाअभावी तो काळाबाजार करूच शकत नसल्याने जिल्ह्णात गेल्या काही वर्षांपासून धान्य काळाबाजार करणाऱ्याची साखळी तयार झाली आहे. गोरगरिबांच्या नावे शासनाकडून स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचे वाटप न करता, त्याची थेट खुल्याबाजारात चढ्या दराने विक्री करण्याच्या या व्यवसायात रेशन दुकानदार, शासकीय यंत्रणेलाही घोरपडे यांच्याइतकाच लाभ झाला असून, तशी बाबही सोमवारी सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे घोरपडे यांनी रेशनच्या काळ्याबाजारातून ज्याप्रमाणे कोट्यवधीची मालमत्ता गोळा केली, ती कशी केली, कोणाच्या संगमनताने केली या साऱ्या बाबी गुन्ह्णाच्या तपासाचा भाग असल्यामुळे आजवर त्यांच्याशी व्यावसायिक व अर्थपूर्ण संबंध ठेवून असलेल्या साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे.