रेशनदुकानदाराची कार्डधारकांनी केली पोलिसांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:19+5:302021-07-21T04:12:19+5:30

नाशिकरोड : सातत्याने दुकान बंद ठेवणाऱ्या रेशन दुकानदाराची थेट पोलिसांत तक्रार केल्यानंतर दुकानात अवतरलेल्या दुकानदाराने पॉझ मशीन बंद ...

Ration shopkeeper's card holder lodged a complaint with the police | रेशनदुकानदाराची कार्डधारकांनी केली पोलिसांकडे तक्रार

रेशनदुकानदाराची कार्डधारकांनी केली पोलिसांकडे तक्रार

googlenewsNext

नाशिकरोड : सातत्याने दुकान बंद ठेवणाऱ्या रेशन दुकानदाराची थेट पोलिसांत तक्रार केल्यानंतर दुकानात अवतरलेल्या दुकानदाराने पॉझ मशीन बंद असल्याचे कारण देत तब्बल तीन तास कार्डधारकांना उभे केल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी संबंधित दुकानदाराचे चांगलेच कान उघडले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याने वाद मिटला असला मात्र ग्राहकांनी काळाबाजाराविषयी संशय व्यक्त केली आहे. गांधीनगर येथील मार्केटमध्ये असलेल्या स्वस्त धान्य दुकानात मंगळवारी कार्डधारकांनी आपला संताप व्यक्त केला. रेशन दुकान क्रमांक ४३ हे दुकान मागील २० ते २५ दिवसांपासून सतत बंद राहात असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी पुरवठा विभागाला केलेल्या आहेत. मात्र दुकानदाराची चौकशी होतच नसल्याने दुकानदार ग्राहकांना न जुमानता दुकान बंद ठेवीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

मंगळवारी सकाळी तीन तास वाट पहिल्यानंतर रेशन दुकानचालक येत नसल्याचे पाहून संतप्त ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्राहकांनी

आजूबाजूच्या दुकानदाराकडे विचारपूस केली असता दुकान नेहमीच बंद राहात असल्याचे तसेच दूरध्वनी उचलत नसल्याचे समेार आले. त्यानंतर ग्राहकांनी गांधीनगर पोलीस चौकीत जाऊन तक्रार केली. अनेक ग्राहक ज्येष्ठ नागरिक व महिला दुरून अन्न-धान्य घेण्यासाठी दुकानात येतात. मात्र दुकान सतत बंद असते, अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या.

दरम्यान, दुकान चालक हा पावणेबाराच्या सुमारास दुकानात आला, मात्र 'पॉस' मशीनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने ग्राहकांना ३ ते ४ तास वाट पाहावी लागली. ग्राहकांनी दुकान चालकाला जाब विचारण्यास सुरुवात केली, पण तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वातावरण चांगलेच तापले. गांधीनगर पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार पी. ए. परदेशी यांनी हस्तक्षेप करून ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन केले. अन्न-धान्य वितरणामध्ये जर काही अडचणी असतील, तर दुकानचालकाने अगोदर याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. किंवा तसे फलक दुकानासमोर लावून द्यायला हवा होता, असे त्यांनी दुकानचालक आणि ग्राहकांची समजूत काढून वातावरण शांत केले. दुपारपर्यंत 'पॉस' मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्या नव्हत्या. दुकान सतत बंद का असते ? याचे उत्तर दुकान चालकाला देता आले नाही.

--इन्फो-

याप्रकरणी पुरवठा निरिक्षकांनी चौकशी करावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. रेशनचे ऑडिट करण्याबरोबरच इतके दिवस दुकाने बंद राहूनही संबंधिताने रेशनधान्य वाटप कसे केले याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांची घ्यावी, अशीदेखील आग्रही मागणी करण्यात आली.

200721\20nsk_76_20072021_13.jpg

संतप्त झालेल्या ग्राहकांनी रेशनदुकानांवर गर्दी

Web Title: Ration shopkeeper's card holder lodged a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.