रेशन दुकानदारांच्या संघटनेत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:22 AM2018-03-31T01:22:27+5:302018-03-31T01:22:27+5:30
दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री बापट यांच्या भेटीसाठी न गेलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे दुकानदार पेचात सापडले आहेत. दुसरीकडे संप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी पुरवठा खात्याचे सुरू केल्याने संपाच्या भानगडीत न पडण्याच्या विचारात दुकानदार असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक : दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री बापट यांच्या भेटीसाठी न गेलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे दुकानदार पेचात सापडले आहेत. दुसरीकडे संप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी पुरवठा खात्याचे सुरू केल्याने संपाच्या भानगडीत न पडण्याच्या विचारात दुकानदार असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत १९ मार्च रोजी राज्यातील हजारो रेशन दुकानदारांनी विधीमंडळावर मोर्चा काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु तत्पूर्वीच पुरवठामंत्री बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहारिक व अवाजवी असल्याचे जाहीर केले होते. मात्र मोर्चेकरी दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे दुकानदार संघटनेने १ एप्रिलपासून राज्यपातळीवर पुकारलेल्या बेमुदत बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर दि. २७ मार्च रोजी फलटण, सातारा, पुणे, नाशिक, नगर, नांदेड येथील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाºयांना पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत चर्चेसाठी बोलावले व या बैठकीत रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत येत्या काही दिवसांत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने रेशन दुकानदारांचा नियोजित १ एप्रिलपासूनचा संप स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. अर्थातच पुरवठामंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत रेशन दुकानदारांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी पुढाकार घेणारे आॅल महाराष्टÑ फेअर प्राइज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर व आॅल महाराष्टÑ स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे संस्थापक व राष्टय अध्यक्ष पुष्कराज (काका) देशमुख हे अनुपस्थित होते.
त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काही जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप स्थगित करण्याची केलेली घोषणा न रुचल्यामुळे त्यांनी बुधवारी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस देऊन संघटनेने कोणताही संप स्थगित केलेला नसून, या संदर्भातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच १ एप्रिलपासून संप सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही दुकानदारांनी १ एप्रिलपासून ईपीडीएस मशीनचा वापर करू नये, असे म्हटले आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याशी दोनच दिवसांपूर्वी सकारात्मक चर्चा झाली असून, काही मागण्यांबाबत त्यांनी लवकरात लवकर पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दुकानदार संघटनेला दिले आहे. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत जर दुकानदारांच्या मागण्यांवर काही विचार झाला नाही तर मात्र संघटनेकडे संपाशिवाय पर्याय नाही. तशी आगावू कल्पना प्रशासनालाही देण्यात आली आहे. - निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना